Wednesday, March 11, 2015

तुझं अस्तित्व पांघरून घ्यायचं रात्रभर,
आणि उत्तरोत्तर
बहरू द्यायचं चांदण्याचं झाड
त्याच्या विरक्त केशरी देठाच्या
जाणीवांसहित .....
मग पहाटे पहाटे
देठातून उन्मळून
झटकून टाकायची
ही आत्मीय फुलं
दव ओल्या भावनांसहित.....
मनात म्हणायचं
किती नश्वर हा प्राजक्तसडा !
आणि मग
आपणच आपला गोळा करायचा
पिठूर स्वप्नांचा चुरा ...

No comments:

Post a Comment