Friday, August 2, 2024

 

तन सुखाचे आगर
तन दुःखाची घागर
जग हिंदोळे दोन्हीचे
कधी बुद्धी कधी मन
कधी चित्ताच्या आल्याड
पूर्णत्वाची आदि ओढ
अनुभवे दिसू लागे
त्याच्या पल्याड आत्मन्
तन मन बुद्धी चित्त
झाले तुझ्या ठायी रिक्त
सुख दुःख समे कृत्त्वा
जग आनंदाचा ठेवा
तुझ्या माझ्या मध्ये शून्य
थोडा लांबला प्रवास
तूच मी नि मीही तूच
तोच योग तो प्रयास

No comments:

Post a Comment