Friday, February 27, 2015

एक स्वच्छ, स्पष्ट, चकचकीत चौकट.
जसे आहे तसे दाखवणारी.
त्यामध्ये दिसतात जे आहेत तेच रंग.
जे मनात उमटतात
तसेच्या तसेच दिसतात त्यामध्ये तरंग.
तिथे काहीच नाही अघळ पघळ,
किंवा चाचरणारं, अरळ अरळ.
विस्कटत नाही कधी प्रतिबिंब
नाही कधी थरथरत.
नाही कधी चलबिचल,
नाही कधी सावरावं लागत.
मी तर कधीच नव्हते एवढी सुंदर !
पण तू समोर उभा राहिलास
आणि गवसले मी मला.
तू आहेस अगदी तस्सा.
मला हवी  असलेली माझी प्रतिमा दाखवणारा.
जणू माझ्याच मनाचा आरसा !

No comments:

Post a Comment