Friday, February 27, 2015

तुझं आयुष्य
काळ्या पांढरया पटासारखं………
आखीव रेखीव
फक्त एवढच  नाही
तर त्यावरच्या चालीसुद्ध्हा किती शिस्तबद्द्ध….
कोणत्याच दैवाधीन फास्यांना जागा नाही तिथे….
सगळी आगेकूच, सगळ्या लढाया, सगळे प्रतिवाद
तुझ्या हातात असणारे….
तुझं आयुष्य एक  बुद्धिबळाचा पट ……….
 मी मी का नाही ओळखलं ,
कोणत्याही अपेक्षेच्या आधीच
बुद्धिबळाच्या पटावरचं
राणीचं नसलेलं स्थान………

No comments:

Post a Comment