Friday, February 27, 2015

सकाळपासून पावसाची चाललीये रिपरिप.
तो computer समोर
ती TV  समोर
ते वाचन करताहेत
मी स्वैपाकघरात !
सकाळपासून फक्त
चहा --
मग नाश्ता
मग परत चहा
मग जेवण
मग परत चहा
मग परत जेवण
मग पावसाची म्हणून
जेवणानंतर परत कॉफी.
फक्त सकाळच्या चहात आलं
नंतरच्या चहात सुंठ
दुपारच्या गवती चहा
आणि रात्रीच्या कॉफीत जायफळ !
एका पावसाळलेल्या रविवारी
कंटाळलेल्या मनाचं
एवढच काय ते कलात्मक सर्जन.

No comments:

Post a Comment