Friday, February 27, 2015

त्याला मूठमाती देऊन आले आज.
पण मीच का? माझ्याच हातून का?
कसा एकदम caretaker असल्यासारखा feel येतोय देवा!
अरे त्याला पाहिलं होतं मी उमलताना, बहरताना !
कळीचं हळूहळू फुल व्हावं तसं विकसित होताना.
अल्लड असताना, प्रगल्भ होताना,
सगळं छान तर चाललं होतं,
आणि हे काय अचानक?
अचानक फोन येतो काय
(तेही मलाच पहिला)
आणि  सहा महिन्यांचा खेळ होतो काय!
मलाच का पहिला? आणि माझीच  निवड कशाला?
युगानुयुगे तीच तीच उत्तरे पटवून  देऊन
तू सुद्धा थकला असशील प्रभो!
पण तुझ्यापुढे उभे ठाकलेले
सगळेच अर्जुन कसे असतील भगवन?
मी त्याहूनही सामान्य.
एवढी स्थितप्रज्ञता तर नाही येणार;
फार फार तर एवढेच  समाधान
मी दिलेल्या मुठमातीने
त्या दोघांनी आता जरा मोकळा श्वास घेतला असेल.

No comments:

Post a Comment