Friday, February 27, 2015

भिजत भिजत आली होतीस
डोळ्यात पूर घेऊन.
आभाळभर बरसली होतीस मला दोष देउन.
आठवतं का म्हटलं  होतं ,
' Life  moves on
सितारोंके आगे भी
होता हैं एक जहान'
निथळत निथळत निघून गेलीस
लपेटून कोवळं  उन.
जखमांवरचे सगळे मलम
काळ  असतोच हातात धरुन.
'मजेत आहेस ऐकलं  होतं
मागच्याच पावसाळ्यात
किती वर्षांनंतरचा हा
उन्हाळा गेला गारव्यात.
म्हणत होतो तेच शेवटी
खरं  झालं  हो ना?
तुझ्यापेक्षा चार पावसाळे
मी जास्त पाहिलेत ना!

No comments:

Post a Comment