Friday, February 27, 2015

जीर्ण जुन्याश्या
उंबरठ्यावर
तुझी पावले
छुमछुमणारी
पडती जेंव्हा
हासत नाचत
आणिक तुझिया
हस्याखातर
वाटे मजला
उघडावी ती 
बंद कवाडे 
पुन्हा एकदा.
मात्र इथूनच
मेंदी भरल्या
किणकिणणाऱ्या 
पदन्यासाने
वाजत गाजत
हा उंबरठा
ओलांडून तू
जाशील निघुनी
त्यावेळी मी
काय करावे 
भकास उघडया
ह्या दारांचे .

No comments:

Post a Comment