तू कधी येशील ?
कधी भेटशील ?
कधी लिहिशील?
फोन करावा का?
आणि मग काय?
कुठे असशील?
उन्हात तर फिरत नसशील ना?
काय करत असशील?
माझी आठवण ?
जेवण तर झालं असेल ना?
काय खाल्लं असशील?
जेवण …. हं ……
सगळेच प्रश्न मी माझ्या एसी खोलीत
आमरसाचं पान पुढे ओढून घेता घेता मनात रेंगाळणारे,
त्यातल्या डाव्या बाजूला घेतलेल्या लोणच्यासारखे,
अधिक म्हणून … भरीला म्हणून ……
No comments:
Post a Comment