Friday, February 27, 2015

रस्ते........

सौन्दार्यासाक्त गुलाबांच्या बागांमधून बाहेर पडून
निघेन मी तुझ्या पर्यंत पोहचण्यासाठी,
तुही टाकशील काही पावलं पुढे.
अधे मधे सापडतील मला  शाश्वतीचे स्तूप
आणि निर्वाणाच्या अंतिम सत्याखुणा
आणि दक्षिणेच्या एका टोकाला येऊन
बघू आपण एकत्रित
एखादा विलोभनीय  सूर्योदय आणि सूर्यास्त,
त्याच्या भगव्या आभेने उजळून निघतील
चार क्षण माझे,
आणि त्या संन्याशाच्या स्मारकापाशी
मी क्षणभर (क्षणभरच) होईन नतमस्तक.......
तरी मला ठावूक आहे  मित्रा.......
आपल्या वाटा आहेत अजूनतरी अगदी भिन्न.....
मी  जाईन (सोयीस्कररित्या) पश्चिमेकडील (अंधाऱ्या) वाटेने .......
आणि तुझ्या प्रत्येक पावलाला  होतील पूर्वरंग अधिकाधिक प्रकाशमय..........

No comments:

Post a Comment