Friday, February 27, 2015

साथ

खरंतर तुटत नाहीत धागे
नुसतीच उसवत राहते वीण.
नायलॉनच्या  दोरासारखा
सैलावत जातो पीळ.
उन येतं वर वर
विरत जातं हवंहवसं धुकं.
पावसासाठी आतुरलेलं
मन होत जातं फिकं.
सैलावत जातात नाती
राहून जातात हातात घ्यायचे हात.
तरीही चारचौघात मिरवतात ते
जन्मभराची साथ.

No comments:

Post a Comment