प्रतिमा
किती जपला तरी गेलाच होता आरशाला तडा.
आणि किती दिवस मी बघत राहिले
त्यात माझी दुभंगलेली प्रतिमा.
आज सकाळी सकाळी आरसा पुसत असताना
हरवले दिवास्वप्नात आणि
आरसा फुटला खळकन.
जमिनीवर अगदी
प्रतिमा प्रतिमा झाल्या.
आता कितीहि प्रयत्न केला तरी
काचा जुळून येणार नाहीत.
कितीही गोळा केल्या तरी
माझ्यातल्या मी मिळून येणार नाहीत.
किती जपला तरी गेलाच होता आरशाला तडा.
आणि किती दिवस मी बघत राहिले
त्यात माझी दुभंगलेली प्रतिमा.
आज सकाळी सकाळी आरसा पुसत असताना
हरवले दिवास्वप्नात आणि
आरसा फुटला खळकन.
जमिनीवर अगदी
प्रतिमा प्रतिमा झाल्या.
आता कितीहि प्रयत्न केला तरी
काचा जुळून येणार नाहीत.
कितीही गोळा केल्या तरी
माझ्यातल्या मी मिळून येणार नाहीत.
No comments:
Post a Comment