Friday, February 27, 2015

तुझ्यामाझ्यातल बंधांतर

तू  येतोस तेंव्हा वाटतं
भेट अशी काही झालीच नाही.
आणि  जातोस तेंव्हा वाटतं
आता परत काही भेट होणार नाही.

माझ्या हातात नसलेलं तुझं
जाणं नि येणं...

नि त्यातलं अंतर देखील कसं
जमीन आणि आवकाशा एवढं मोठं.
वळीवाइतक अनिश्चित.
पार करायला जन्मजन्मान्तरं लागतील
इतकं कठीण
आणि युगानुयुगान एवढं कालव्यापी.

आणि हेही माझ्या हाताबाहेर
कि तू गेल्यावर
तुझं मनभर उरून राहणं.

तेही कसं .....
झोक्याच्या एका हिंदोळ्यावर
जमीन आकाशातलं अंतर मिटून जाईल इतकं तत्कालीत
वळीवानंतरच्या मृदगंधाइतकं निश्चित.
युगानुयुगे स्त्रीच्या मनात असलेल्या
वात्सल्याच्या भावानेइतकं कालातीत
आणि जन्माजान्मान्तारीच्या मातृत्वाच्या नात्याइतकं
सहज आणि सरल.......

No comments:

Post a Comment