चकवा
अशी मोहवाट
अशी भूलसाद
दिव्याकडे पाठ होते
अन चकव्याची सुरवात.
असक्ताशी काचफुले
वाटे वाटेत पेरली
चालताना न कळे
कधी पावले रक्ताळली.
मागे राहिले ना काही
सुखामागे धावताना
रक्ताळल्या पावलांनी
दिल्या स्पर्श यातना.
कसा जीवघेणा
सुखाचा प्रवास
ना पुढे दिसे मार्ग
ना परतीची आस.
अशी मोहवाट
अशी भूलसाद
दिव्याकडे पाठ होते
अन चकव्याची सुरवात.
असक्ताशी काचफुले
वाटे वाटेत पेरली
चालताना न कळे
कधी पावले रक्ताळली.
मागे राहिले ना काही
सुखामागे धावताना
रक्ताळल्या पावलांनी
दिल्या स्पर्श यातना.
कसा जीवघेणा
सुखाचा प्रवास
ना पुढे दिसे मार्ग
ना परतीची आस.
No comments:
Post a Comment