Friday, February 27, 2015

तप्त नव्हती वादळेही दग्ध नव्हत्या भावनाही
शुष्क का हे रान झाले पालवी ती का फुटेना.
काय झाले ते कळेना ………

शब्द विझले ना फुलेना सूर विरले सापडेना
भाव जे थिजले कधीचे सोसवेना साहवेना.
काय झाले ते कळेना ………

घट्ट होता दोर तोही जीर्ण नव्हती वीण ही ती.
का तरी सैलावलेला पीळ जीवाचा जुळेना.
काय झाले ते कळेना ………

साद जी होती दिलेली का पुन्हा आली फिरुनी
काय तो माझाच आणिक काय मी अपराध केला.
काय झाले ते कळेना ………

No comments:

Post a Comment