Friday, February 27, 2015

अनाकलनीय होत होत
जलभारीत घनसावळी मिठी सोडवून
पांढऱ्या शुष्क मेघासारखा
तो ह्या कड्यावरून
त्या कड्यावर जाऊन विसावला.
आता त्या पर्वतावरच्या दोन उत्तुंग कड्यावरून
गर्जनांचे उमटत राहतात ध्वनी आणि प्रतिध्वनी!
उमटत नाहीत ते साद आणि प्रतिसाद!

No comments:

Post a Comment