पत्त्यांमध्येही असतीलच ना हेवेदावे,
मत्सर, अहंकार!
तेही खेळले जात असतात
कोणाच्या तरी मर्जीने.
त्यांच्याही पुढे असतातच challenges,
मिळतातच penalties, झब्बू,
तेही जिंकतात, हरतात.
कधीतरी त्यांनाही कळून चुकतात छक्के पंजे.
त्यांनाही हाताशी धरावे लागतात हुकुमाचे एक्के,
आणि गरज असते विदुषकांची.
सगळ्यात मुख्य म्हणजे
तेही लावत असतात एक sequence,
ज्यामुळे ठरतात श्रेष्ट, कनिष्ठ.
आणि मग होतातच सुरु
सावतीसुभे, खेचाखेची, पाय ओढणे.
पत्त्यांच्या राज्यात एक मात्र वेगळं.
ते पिसले जात असतात पुन्हा पुन्हा
आणि मांडू शकतात डाव नव्याने.
त्यांची होतात असंख्य permutations - combinations.
तेंव्हा कुठलीच जन्मजात बांडगुळं
चिटकून राहत नाहीत त्यांना.
निदान कधीतरी करायलाच पाहिजे
आपणही असं shuffling !
No comments:
Post a Comment