त्या जुन्या रस्त्यावर तू
पुन्हा एकदा दिसलास.
पुन्हा एकदा वाटेवरल्या
काट्यासारखा रुतालास.
ह्याच ठिकाणी पडले होते
केव्हढी अडखळून.
ह्याच जागेवर वाहिली होती
जखम भळभळून.
माणसं बदलली कि
बदलून जावा रस्ता.
त्यात जुनं माणूस, जुनं वळण
उर दाटून येतो नुसता !
माझ्या रस्त्यावर तर सगळं
लखलखीत, नेटकं, नवं.
कुठे वसत असतील मग
आठवणींची गावं ?
पुन्हा एकदा दिसलास.
पुन्हा एकदा वाटेवरल्या
काट्यासारखा रुतालास.
ह्याच ठिकाणी पडले होते
केव्हढी अडखळून.
ह्याच जागेवर वाहिली होती
जखम भळभळून.
माणसं बदलली कि
बदलून जावा रस्ता.
त्यात जुनं माणूस, जुनं वळण
उर दाटून येतो नुसता !
माझ्या रस्त्यावर तर सगळं
लखलखीत, नेटकं, नवं.
कुठे वसत असतील मग
आठवणींची गावं ?
No comments:
Post a Comment