Friday, February 27, 2015

अजून दिसत नाही ते ठिकाण
जिथे आहे जायचे.
अजून लागत नाहीत मनाला
ठाव मनाचे.
किती वावटळ, किती वादळवारे
करून जातात क्षणामध्ये
उध्वस्त किनारे...
त्यानाही कोण जाणे
कसे दोष द्यायचे...
अजून किनारेही मातीचे
आणि किल्लेही मातीचे.....

No comments:

Post a Comment