स्वाभिमान शिल्लक राहावा म्हणून
नवऱ्याच्या घराबाहेर पडणारी
शिकली सावरलेली मध्यमवर्गीय स्त्री
आणि नवऱ्याचा मार सहन करत
घरात पडून राहणारी एखादी अडाणी बाई....
ह्या तशा सारख्यास भासतात
दोघीही शोधत राहतात
थोडासा प्रकाश......
जगण्यासाठी......
आपापल्या कुवतीनुसार,
मात्र
वर्षानुवर्ष नवऱ्याचा मानसिक त्रास सहन करणारी
सुशिक्षित स्त्री
आणि दारुड्या नवऱ्याला लाथ घालून
घराबाहेर काढणारी अशिक्षित बाई
ह्या मात्र खूप भिन्न
एक राहते उत्क्रांतीच्या दिव्याखाली चाचपडत...
आणि दुसरी लावते क्रांतीची ज्योत तेवत....
नवऱ्याच्या घराबाहेर पडणारी
शिकली सावरलेली मध्यमवर्गीय स्त्री
आणि नवऱ्याचा मार सहन करत
घरात पडून राहणारी एखादी अडाणी बाई....
ह्या तशा सारख्यास भासतात
दोघीही शोधत राहतात
थोडासा प्रकाश......
जगण्यासाठी......
आपापल्या कुवतीनुसार,
मात्र
वर्षानुवर्ष नवऱ्याचा मानसिक त्रास सहन करणारी
सुशिक्षित स्त्री
आणि दारुड्या नवऱ्याला लाथ घालून
घराबाहेर काढणारी अशिक्षित बाई
ह्या मात्र खूप भिन्न
एक राहते उत्क्रांतीच्या दिव्याखाली चाचपडत...
आणि दुसरी लावते क्रांतीची ज्योत तेवत....
No comments:
Post a Comment