दिवस सरताना असतो रोज एकाच प्रश्न मनात,
'तळ्यात कि मळ्यात ?'
परिघाच्या आतमध्ये राहून खुणावत राहतं
बाहेरचं वारं मनमोकळं.
मात्रं त्या वाऱ्याबरोबर येतात
संघर्ष वादळं नि वावटळं.
तेंव्हा आपल्याश्या वाटतात
चौकटीतल्या उबदार भिंती
स्थैर्य, सुरक्षितता आणि काही अटळ नाती.
परीघावर घर बांधायच म्हटलं
कि ना जिंकले जातात बुद्धिबळाचे डाव पुरेसे
ना मांडले जातात भातुकलीचे खेळ नीटसे.
हि रोजचीच तर असते तारेवरची कसरत.
सगळी शक्ती पणाला लावायची
फक्त डोंबाऱ्याचा खेळ करत !
'तळ्यात कि मळ्यात ?'
परिघाच्या आतमध्ये राहून खुणावत राहतं
बाहेरचं वारं मनमोकळं.
मात्रं त्या वाऱ्याबरोबर येतात
संघर्ष वादळं नि वावटळं.
तेंव्हा आपल्याश्या वाटतात
चौकटीतल्या उबदार भिंती
स्थैर्य, सुरक्षितता आणि काही अटळ नाती.
परीघावर घर बांधायच म्हटलं
कि ना जिंकले जातात बुद्धिबळाचे डाव पुरेसे
ना मांडले जातात भातुकलीचे खेळ नीटसे.
हि रोजचीच तर असते तारेवरची कसरत.
सगळी शक्ती पणाला लावायची
फक्त डोंबाऱ्याचा खेळ करत !
No comments:
Post a Comment