Friday, February 27, 2015

मी घराबाहेर पडून शोधत राहते
माझ्या सैरभैर आयुष्याचं प्रयोजन
आणि नाहीच सापडत म्हणून
घरात येउन करत राहते  काहीबाही,
आवरत राहते कपाट,
उचकटत राहते कप्पे,
तेंव्हा सापडतात
अर्धवट लिहिलेल्या कविता,
विकत आणून ठेवलेली पण
आता रस संपलेली,
 न वाचलेली पुस्तक,
संपर्क नसलेल्या मैत्रिणींची
एकेकाळची भावपूर्ण पत्र,
आणि पोस्ट करायची राहून गेलीली काही...
आलेल्या भेटी,
वहिमधलि सुकलेली फुलं,
आठवण म्हणून ठेवलेल्या खूप काही वस्तू......
सगळच अस्ताव्यस्त......
तेंव्हा मला घरातच सापडतं
माझ्या सैरभैर आयुष्याचं कारण.
आणि घरापासून घरापर्यंतच्या येरझाऱ्यामध्ये
मी शोधून ठेवते त्याचं समर्थन,
प्रयोजन सापडत नाही तेव्हा.... 

No comments:

Post a Comment