Friday, February 27, 2015

पावसात चालूनही एकत्र
तो कुठला अडसर होता
ज्याच्यामुळे ना आपण भिजलो
ना एकटेपण संपलं.

तरीदेखील पावसाबरोबरच हे कुठलं नातं
कायमचं जपलं गेलं.
कि ज्याने कित्येक पावसाळे न भिजूनही
ना भिजण्याची उर्मी संपली
ना हिरवेपण सरलं.

पाहिलेल्या प्रत्येक पावसानेच
बहुदा हे शिकवल,
प्रत्येकाचा पाउस आपापला
अन चिंब होणं हे तर खूपच आपापलं.

No comments:

Post a Comment