Friday, February 27, 2015

भल्या पहाटे प्राजक्ताची 
फुले कधी टपटपली.
निशिगंधाची पुष्पकळी कधी
पूजे प्रती वाहियली.

ऐन  दुपारी कधी अनुभवली 
गुलमोहराची लाली.
दुपार सरता कधी बहरला
बहावा सोनसळी.

किती वेचली फुले आणिक
किती शोषिला गंध.
एकमेकासवेत जगलो
क्षण तारुण्याचे धुंद.

बघता बघता सरून गेला
बेधुंदीचा  काळ.
म्हणता म्हणता आयुष्याची
झाली संध्याकाळ.

नसतील आता फुले गंध अन
वृक्ष आता निष्पर्ण  असा.
घेशील ना तू कवेत तरीही
वाऱ्यासम घ्यायचा जसा.

No comments:

Post a Comment