उरातलं वादळ शमल्यानंतर
तू कपाळावर ओठ टेकवतोस.
कधी वाटतं हे खरं प्रेम.
कधी वाटतं हा फक्त एक सवयीचा पूर्णविराम.
कधी वाटतं हि कृतज्ञता.
आणि कधीतरी वाटून जातच
हि तर साखरपेरणी.
कधी वाटतं किती हि शुल्लक गोष्टं !
कधी वाटतं हि सगळी आपलीच फिल्टर्स !
आणि कधी वाटतं कोण हे दुहेरी व्यक्तिमत्व !
मी स्किझोफ्रेनिक तर नाही होणार ?
No comments:
Post a Comment