मी तुला पहिले जेंव्हा
भगभगत्या प्रकाश राती
मनात तरळून गेल्या
मंद तेवत्या वाती.
मी तुला शोधिले जेंव्हा
त्या निळ्या तळ्याच्या काठी
झाले गाभारे हिरवे
अन कळस नीळा तुजसाठी.
मी तुला इच्छिले जेंव्हा
निसंगाचा होऊन मोह.
स्वच्छ नितळसे झाले
संगाने मन डोह.
मी तुला स्पर्शिले जेंव्हा
त्या फसव्या कातरवेळी.
इच्छांची झाली राख.
मोहाची झाली होळी.
भगभगत्या प्रकाश राती
मनात तरळून गेल्या
मंद तेवत्या वाती.
मी तुला शोधिले जेंव्हा
त्या निळ्या तळ्याच्या काठी
झाले गाभारे हिरवे
अन कळस नीळा तुजसाठी.
मी तुला इच्छिले जेंव्हा
निसंगाचा होऊन मोह.
स्वच्छ नितळसे झाले
संगाने मन डोह.
मी तुला स्पर्शिले जेंव्हा
त्या फसव्या कातरवेळी.
इच्छांची झाली राख.
मोहाची झाली होळी.
No comments:
Post a Comment