किती चित्र रेखाटूनहि
झालं नाही कुठलंच परिपूर्ण
मात्र कुठल्या प्रेरणेने जोडली सर्व
आणि झालं हे सुंदर कोलाज ?
किती सप्तकं फिरूनही
सूर झाले नाहीत स्वर्गीय
मात्र कुठल्या गंधर्व स्पर्शाने
रंगली हि मैफिल आणि
म्हटलं गेलं त्याला फ्युजन?
विचारांच्या महासागरात किती शिंपले शोधले
तरी गवसला नाही कशातच मोती
मात्र कुठल्या मंथनाने थांबल्या ह्या लाटा
आणि हाती आला 'अमृतानुभव'?
झालं नाही कुठलंच परिपूर्ण
मात्र कुठल्या प्रेरणेने जोडली सर्व
आणि झालं हे सुंदर कोलाज ?
किती सप्तकं फिरूनही
सूर झाले नाहीत स्वर्गीय
मात्र कुठल्या गंधर्व स्पर्शाने
रंगली हि मैफिल आणि
म्हटलं गेलं त्याला फ्युजन?
विचारांच्या महासागरात किती शिंपले शोधले
तरी गवसला नाही कशातच मोती
मात्र कुठल्या मंथनाने थांबल्या ह्या लाटा
आणि हाती आला 'अमृतानुभव'?
No comments:
Post a Comment