ह्या तीराच्या जरा अलीकडे
मोहफुलांचे वाटेवर सडे.
मात्र पलीकडे अगदी थोडे
निळा कळस अन मुक्त कवाडे.
ऐलतीरावर येता क्षणभर
आसक्तीचा नयनी पूर
अन थोडे मी ओलांडून जाता
मंदिरी वासना होईल कापूर.
ह्या तीरावर मज हातांचा
विटाळ होईल तुला स्पर्शिता
त्या तीरावर स्पर्शून घेता
अहिल्येसही मिळेल मुक्तता.
पैलतीराची ओढ अनावर
प्रवाहास पण वेग अमाप
मोक्षाचा हा प्रवास अवघड
कि द्वैताचा नशिबी शाप?
मोहफुलांचे वाटेवर सडे.
मात्र पलीकडे अगदी थोडे
निळा कळस अन मुक्त कवाडे.
ऐलतीरावर येता क्षणभर
आसक्तीचा नयनी पूर
अन थोडे मी ओलांडून जाता
मंदिरी वासना होईल कापूर.
ह्या तीरावर मज हातांचा
विटाळ होईल तुला स्पर्शिता
त्या तीरावर स्पर्शून घेता
अहिल्येसही मिळेल मुक्तता.
पैलतीराची ओढ अनावर
प्रवाहास पण वेग अमाप
मोक्षाचा हा प्रवास अवघड
कि द्वैताचा नशिबी शाप?
No comments:
Post a Comment