वैशाखाच्या वणाव्यानंतर
येशील होऊन वळीव अचानक
मुसळधार पण बिन आश्वासक
करून जाशील झाडाझडती
कष्टाने वाढविल्या रोपांची
खोल न गेल्या पान मुळांची.
अशा तुझ्या ह्या आवेशावर
सांग येई का भिजता रुजता?
येशील जेंव्हा संतत नियमित
आषाढाची होऊन रिपरिप
रोजचाच तू म्हणुनी तेंव्हा
असाच निसटून जाशील अवचित.
येशील जेंव्हा राजेशाही
आवडणारा मला अतिशय
हस्तामधला गरजत बरसत
सांग तरी रे कुठे राहिले
दिवस पूर्वीचे समर्पणाचे
मेघांच्या गडगडाटामध्ये
विजेसम लखलख करण्याचे ?
परी येशील का तू होऊन श्रावण
हलके हलके भिजवत तनमन.
त्यात लपेटून उन कोवळे
प्रीतीचे ते खेळ आगळे
असाच ये तू कुणा न कळता.
सुकलेपण हे संपविणारा
भिजलेपण जरी जपणारा तरी
ओलेतेपण लपविणारा.
येशील होऊन वळीव अचानक
मुसळधार पण बिन आश्वासक
करून जाशील झाडाझडती
कष्टाने वाढविल्या रोपांची
खोल न गेल्या पान मुळांची.
अशा तुझ्या ह्या आवेशावर
सांग येई का भिजता रुजता?
येशील जेंव्हा संतत नियमित
आषाढाची होऊन रिपरिप
रोजचाच तू म्हणुनी तेंव्हा
असाच निसटून जाशील अवचित.
येशील जेंव्हा राजेशाही
आवडणारा मला अतिशय
हस्तामधला गरजत बरसत
सांग तरी रे कुठे राहिले
दिवस पूर्वीचे समर्पणाचे
मेघांच्या गडगडाटामध्ये
विजेसम लखलख करण्याचे ?
परी येशील का तू होऊन श्रावण
हलके हलके भिजवत तनमन.
त्यात लपेटून उन कोवळे
प्रीतीचे ते खेळ आगळे
असाच ये तू कुणा न कळता.
सुकलेपण हे संपविणारा
भिजलेपण जरी जपणारा तरी
ओलेतेपण लपविणारा.
No comments:
Post a Comment