सगळ्या खापल्यांची मिळून ना
एकच जखम होत असावी बहुदा !
कारण असं का होत असावं
जरा कुठे काही उकललं
कि वहायला लागतात
भळाभळा इतरही
जुळ्यांच्या दुखण्यासारख्या !
कि दुखाःचाच एक अश्वत्थामा होत असावा!
चिरकालीन, चिरंजीव , अमर….
तहहयात कल्पकल्पान्तापर्यंत
तेल मागत फिरणारा…
शरीरभर, मनभर….
शरीराकडून , मनाकडून………
कि वेदनांचं एक आख्ख
गावच वसत असावं आपल्या मनात ?
कि जागी व्हावी एखादी
किंवा पाहुणी यावी कोणीतरी
आणि सगळ्या म्हातारया कोतारया
तरण्या ताठ्या,
पूर्वीच्या, कालपरवाच्या आणि अगदी आजच्यासुद्धा
उठाव्यात नव्या जोमाने
आणि फेर धरून नाचू लागाव्यात
स्वागतासाठी!
No comments:
Post a Comment