Friday, February 27, 2015

कुठे काही द्यायचय
कुठे काही घ्यायचय
कुठे हातात हात घेऊन
एक गाणं गायचय.

कुठे आहेत फुलांच्या
पायघड्या अंथरलेल्या
कुठे आहेत काही  पुढे
पताके गुढ्या उभारलेल्या.

पुढे आहेत रस्ते बंद
परत परत बजवायचय.
कितीही असेल मोहक तरी
ह्या वळणावरच मागे वळायचय.

No comments:

Post a Comment