Friday, February 27, 2015

चार खांद्यांसाठी............

फटकळ बोलायचात
पण सत्य होतं म्हणून?
दाढी वाढवलीत,
भगवी वस्त्र परिधान केलीत म्हणून?
खुर्चीचा मोह सोडलात म्हणून?
स्वतःच्या पोरांसारख सगळ्यांना मोठं करत गेलात पण
गेलेल्यांना थांबवण्याच्या फंदात पडला नाहीत म्हणून? आणि तरीही -
तुमच्यानंतर सगळ्यांच्याच मनात पोरकेपणाची भावना.....
न बोलावता, कोणतेच ट्रक टेम्पो न पाठवता
हा अथांग जनसमुदाय तुमच्यासाठी.....
कारण आमच्या आकलना पलीकडच.
आणि आम्ही गोडीगुलाबीने बोलून,
वेगवेगळ्या पद्धतीने, क्ल्युप्तीने  माणसं जोडण्यासाठी फक्त
वेचीत राहतो आमचं संपूर्ण आयुष्यं
आणि सरतेशेवटी चार खांद्यांची सुद्धा  शाश्वती नसते.
म्हणूनच कि काय पोर बापाला विसरून
सातासमुद्रापलीकडे गेली तरी,
इथेच राहून न विचारती झाली तरी,
गोंजारत राहतो त्यांना शक्य तेवढं......
चार खांद्यांसाठी............

No comments:

Post a Comment