स्वाभिमान शिल्लक राहावा म्हणून
नवरयाच्या घराबाहेर पडणारी
शिकली सावरली मध्यमवर्गीय स्त्री
आणि नवरयाचा मार सहन करीत
घरात पडून राहणारी एखादी अडाणी बाई
ह्यांना जेंव्हा मी एकाच तराजूत तोलते
तेंव्हा मला त्या सारख्याच भासतात.
आयुष्याला त्यांच्या परीने त्यांनी दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया...
मात्र वर्षानुवर्ष नवरयाचा मानसिक त्रास सहन करणारी
सुशिक्षित स्त्री आणि
दारुड्या नवरयाला घराबाहेर काढणारी अशिक्षित बाई
ह्या मात्र मला फार फार भिन्न वाटतात.
एक राहते उत्क्रांतीच्या दिव्याखाली चाचपडत
आणि दुसरी ठेवते क्रांतीची ज्योत तेवत.

No comments:
Post a Comment