हिरव्यागार लोंनवर,
काळ्या चकचकीत बुटांखाली,
नाजूक साजूक पेन्सील हिल्स खाली,
न सुटणाऱ्या प्रश्नांच्या
किती गुंतवळी मध्ये मध्ये येत असतील?
उंची ब्लेझर्सच्या आसपास,
हिर्यांच्या लकाकीभोवती,
न संपणाऱ्या प्रश्नांच्या
किती भुतावळी फेर धरत असतील?
रात्र चढत जाताना,
रुचकर पदार्थांच्या जोडीने,
ग्लासांच्या आवाजाच्या किणकिणाटात,
बदललेल्या पावलांच्या सोबतीमुळे,
अशा किती गुंतवळी सैलावत असतील?
रिचवलेल्या पेगांनी,
चढलेल्या आवाजांनी,
हास्याच्या गोंगाटानी,
अशा किती भुतावळी
घाबरून पळून जात असतील?
असतील का खरच?
काळ्या चकचकीत बुटांखाली,
नाजूक साजूक पेन्सील हिल्स खाली,
न सुटणाऱ्या प्रश्नांच्या
किती गुंतवळी मध्ये मध्ये येत असतील?
उंची ब्लेझर्सच्या आसपास,
हिर्यांच्या लकाकीभोवती,
न संपणाऱ्या प्रश्नांच्या
किती भुतावळी फेर धरत असतील?
रात्र चढत जाताना,
रुचकर पदार्थांच्या जोडीने,
ग्लासांच्या आवाजाच्या किणकिणाटात,
बदललेल्या पावलांच्या सोबतीमुळे,
अशा किती गुंतवळी सैलावत असतील?
रिचवलेल्या पेगांनी,
चढलेल्या आवाजांनी,
हास्याच्या गोंगाटानी,
अशा किती भुतावळी
घाबरून पळून जात असतील?
असतील का खरच?
No comments:
Post a Comment