सुन्न काळोख्या प्रहरी
झाले रान हे निद्रिस्त
सारे जीवनच जसे
तळ्याकाठी समाधिस्त.
पानांची न सळसळ
पाण्यावर ना तरंग
नाही वाऱ्याचाही झोका
मूक निजले विहंग.
दाटलीशी निस्तब्धता
आसमंता भारलेली
जाणिवांच्या पलीकडे
सुखनिद्रा ओढलेली.
तिथे काळ थांबलेला
आणि प्रहर गोठला
त्याला चेतवाया जणू
झळाळली रक्तज्वाला.
कोणी दूरस्थ पांथस्थ
येतो आहे भेटायला
त्याच्या चाहुलीने कसा
अणु रेणु चेतवला.
त्याने मिसळले जेंव्हा
त्याचे सोनसळी अंग.
निळ्या डोहाचाही झाला
तेजोमय स्वप्नभंग.
पाण्यावर हलकेच
उमटली गोल नक्षी
आणि प्रसन्न सुरांची
तान घेत गेला पक्षी.
पिंपळाने झटकला
त्याचा निश्चय भगवा
प्रकृतीने पांघरला
रंग मायेचा हिरवा.
आक्रमला जरी त्याने
नित्य क्रम फकिराचा
तरी धरतीला झाला.
मोहमयी स्पर्श त्याचा.
झाले रान हे निद्रिस्त
सारे जीवनच जसे
तळ्याकाठी समाधिस्त.
पानांची न सळसळ
पाण्यावर ना तरंग
नाही वाऱ्याचाही झोका
मूक निजले विहंग.
दाटलीशी निस्तब्धता
आसमंता भारलेली
जाणिवांच्या पलीकडे
सुखनिद्रा ओढलेली.
तिथे काळ थांबलेला
आणि प्रहर गोठला
त्याला चेतवाया जणू
झळाळली रक्तज्वाला.
कोणी दूरस्थ पांथस्थ
येतो आहे भेटायला
त्याच्या चाहुलीने कसा
अणु रेणु चेतवला.
त्याने मिसळले जेंव्हा
त्याचे सोनसळी अंग.
निळ्या डोहाचाही झाला
तेजोमय स्वप्नभंग.
पाण्यावर हलकेच
उमटली गोल नक्षी
आणि प्रसन्न सुरांची
तान घेत गेला पक्षी.
पिंपळाने झटकला
त्याचा निश्चय भगवा
प्रकृतीने पांघरला
रंग मायेचा हिरवा.
आक्रमला जरी त्याने
नित्य क्रम फकिराचा
तरी धरतीला झाला.
मोहमयी स्पर्श त्याचा.
No comments:
Post a Comment