Friday, February 27, 2015

हा खेळ मांडताना मी हासणार आहे.
 हे दोर हातचेही तो फासणार आहे.
 निष्पर्ण जाहल्याने  हे झाड ह्या शिशीरी
वेलीवरीच आता सारी मदार आहे.
नाकारले जरी तू अत्यंत मार्दवाने
 झालाच जो जिव्हारी तो खोल वार आहे.
रात्रंदिनी स्वतःचे देवत्व ना म्हणोनी
सोन्यात माखणे  हा दैवी प्रकार आहे.
मीही हसून अंती अच्छा तुला म्हणाले
 माझाच आसवांशी आता करार आहे.
केला किती जरी तू माझाच नाश  अंती
राखेतुनी नव्याने मी जन्मणार आहे.

No comments:

Post a Comment