खुशाल उतरावं पाण्यात
आणि लाटांचे सोहळे करावेत. कधी बसावं किनाऱ्यावरती आणि विरघळू द्यावेत पाय निळ्या हिरव्या पाण्यात. मनमुराद भिजावं मुसळधार धारांत आणि रुजून यावं गात्रा गात्रात. मात्र कधीतरी दूर यावं.. इतकं दूर कि कळेल कुठली गलबतं हाकाटली गेली खरंच आणि कोणत्या शीडांमध्ये वारं राहिलं भरायचं. इतकं दूर कि कळेल पुलाखालून किती पाणी वाहून गेलं... आणि मोजता येतील पावसाळे डोळ्याखालून गेलेले.. शेवटी पाणी पाणी म्हणत होतो ती खरंतर सगळी बंदरं ; एवढं कळलं कि सोप्पं होतं पाठ फिरवून निघणं. |
Sunday, July 19, 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment