शार्दुलविक्रिडीत
सुनीत
कौलारू
भवना पुढून निघता आल्या स्मृती दाटुनी
विद्येची
पहिली इथेच लिहिली बाराखडी घोकुनी
स्वप्नांचे
रचले इथेच इमले कित्येक भारावुनी
पुष्पे
ही फुलली कितीक पुढती रूजून मातीतुनी
दारातून
तिच्या प्रवेश करता शंका किती ह्या मना.
राहील्या
असतील ना हरवल्या का ओळखीच्या खुणा.
माथा
हा चरणी सदैव झुकला ती भेट होईलना.
पूर्वीचे स्मरतील ना सहजसा आशीष देतीलना.
काही
काळ जरी मधून सरला जागी स्मृती जाहली.
आनंदे
बघता जुन्या गुरुजनां नेत्रेच पाणावली
काळाचा
परि हा असाच महिमा चुकला कधी का कुणा?
शिष्येची
बघताच उन्नति जरा व्यवहार आला मना.
शाळेची
बघ जाहली मज कशी ही दुर्दशा सांगती.
पाठी
हात न ठेविला पळभरी नी देणगी मागती.
No comments:
Post a Comment