Friday, February 27, 2015

खोल खोल अथांग पोकळीत
कोणीतरी फेकून दिल्यागत
ना आगा ना पिछा असल्यासारखी
शून्यवत, एकाकी अवस्था
जागेपणाच्या आणि स्वप्नाच्या सीमेपाशी असावी.
आणि दुस्वप्नाचे पाश तोडून भल्या पहाटे
भर थंडीत दरदरून घाम येउन डोळे उघडावेत.
आणि शेजारी आपली माणसं बघून
एक दीर्घ निश्वास टाकावा.
ह्या कुशीवर वळताना
आठवावा जागेपणाचा अहंकारी एकाकीपणा
म्हणून त्या कुशीवर वळून
कुरळ्या केसातून हात फिरवल्यावर
किंचित हसून तिनं बिलगावं.
छोट्या छोट्या हातांवरचं पांघरूण सारखं करत
पुन्हा डोळे मिटावेत निशंक मनाने
स्वतःला समजावत
'हो ते स्वप्नच होतं'
ते एकाकीपण नाही खरं.
(निदान हिचं अवलंबित्व संपेपर्यंत तरी) 

No comments:

Post a Comment