Friday, February 27, 2015

निरंतर सत्वाच्या शोधात निघताना
थांबायची मी नेहमीच
माझ्या अंगणतल्या प्रजक्तापाशी।
भरभरून सुगंध घ्यायची
त्या अशाश्वत फुलांचा,
जी मला जाणीव करुन द्यायची
त्यांच्या चिरंतन सुगंधाची
आणि माझ्या श्वासात दरवळणारया
माझ्या स्वत्वाची।
आश्वासित व्हायची मी फुलांच्या
कालच्या आणि आजच्या एकसारख्या गंधाने
आणि माझ्या सत्वाच्या दरवळाने।
मधे बऱ्याच दिवसांपासून मात्र
फुलांचा गंधच येईनासा झालाय,
तेंव्हा जाता येता फुलांवर पाय पडतो म्हणून
मन हळहळायचं तरी।
आता तर सुकलेल्या फुलांचा त्रास होतो म्हणून
झाड़च तोडायचा विचार चाललाय।

No comments:

Post a Comment