नवऱ्याच्या बाजूने तिची
उलटतपासणी घेत असताना
"ह्याचा अर्थ त्यांनी
तुम्हाला घरातून जा
असं सांगितलं असं नाही, बरोबर ?"
माझ्या ह्या प्रश्नावर उत्तर देण्याअगोदर
माझ्या ह्या प्रश्नावर उत्तर देण्याअगोदर
तिच्या डोळ्यात पाणी
तरळलं तेंव्हा
क्षणभरासाठी माझी जागा बदलली गेली.
क्षणभरासाठी माझी जागा बदलली गेली.
मी उभी आता विटनेस
बॉक्समध्ये....
"कुठे हरवली ? पुढे काय
झालं ?
कधी? केंव्हापासून? १२ वर्षे?
छे! एवढं जुनं नसावं हे सगळं !
मग किती अलिकडे?
exactly सांगता येईल?
आठवत नाही? पुन्हा आठव!
एखादी अलीकडची घटना? छे! एवढं जुनं नसावं हे सगळं !
मग किती अलिकडे?
exactly सांगता येईल?
आठवत नाही? पुन्हा आठव!
कसं झालं? कोणामुळे?
कशामुळे? सांगावच लागेल!
घटनाक्रम नीट आठव!
पाहिजे तर घे हे काही
उजळणी करायला!
नीट विचार करून बघ.
आणि पुरावा?"
……. पुरावा?
हा काय, अंगावर वागवत आहे तो काळा कोट!
No comments:
Post a Comment