ते शेजारती करतात तशीच भूपाळीही गातात
उन उन पाणी, साखर घालून दूध, तिन्ही त्रिकाळ महाप्रसाद ... येताना घंटा वाजवतात जाताना पाठ होऊ देत नाहीत मोगरा असला की मोगरा वाहतात काहीच नसेल तर अक्षता तरी वाहतात थंडी आली की लोकरीची वस्त्र नेसवतात आणि उन्हाळ्यात वाळ्याची आरास... थंडीत गरम गरम शिरा करतील तर उन्हाळ्यात द्राक्षांची माळ घालतील सगळे ऋतूंचे सोहळे... जसे त्यांचे तसेच आपलेही मग त्यांचे दरवाजे बंद तसेच आपलेही त्यांची भेट बंद, तशी आपलीही आपण नाही कुणी पूर्णतः वेगळे आपण त्यांचा सखा, मित्र आपला अंश त्यांच्यामध्ये, छे! आपण सर्व एकाच तत्त्वाचे अंश हे ते जोवर मानत राहतील तोवर दरवाजे लागले तरी बासरी वाजवणं थांबवता नाही येणार राधे.... - विभावरी |
Thursday, April 16, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment