Thursday, July 4, 2019

वारी जन्मोजन्मी
पावले भाजती
तप्त वाळवंटी
नाथ नाही

वैशाखाचा ताप
सरेना सरता
कृपाछत्र आता
धरा देवा

समजून घ्यावा
भक्ती-कर्म योग
संसाराचा भोग
पांडुरंगा

तुझा काळा रंग
नभानेही प्यावा
आणि बरसावा
आशिर्वाद

बीज तरारावे
आणि अंकुरावे
चराचरी यावे
विठ्ठला तू

उभा विटेवरी
कटीवर हात
कोसळ सोडत
मेघदूता

पुण्यनगरीत
धाव आज तुझी
पालखी नभाची
उतरावी

- विभा

No comments:

Post a Comment