Thursday, July 4, 2019

खिडकीच्या ह्या कट्ट्यावर नेहमीच असतो दिवसभर
अनेक गोष्टींचा पसारा
कधी माझी कानातली, क्लीप्स, पेन्स
कधी तुझ्या पावत्या, रूमाल, विजिटींग कार्ड्स
कधी हिच्या खाऊन झालेल्या रिकाम्या बशा, पत्ते, बाहुल्या....
रात्रीच एकदम नेटका होतो हा कट्टा!
आणि पहाटे कधीतरी पश्चिमेकडून उतरतं त्यावर चतुर्थीचं मंदमौक्तिक चांदणं
शेजारी तू असतोस
आणि....
उजाडायला अजून बराच अवकाश असतो....
आदतन आपके शून्य को
जोडती चली गयी
कवितामें,
मुलाकातमें
कभी रसोईके परोसे हुए पदार्थमें
हर खुबसुरत चीजमें
आदतन आप वही शून्य
गुणन करते रहे
हर प्रत्याशी जगह...
की शून्य ही रहना चाहिये
आदतन शून्य जीत गया
आदतन सिफर छा गया
आदतन आपने हमे भुला दिया
आदतन हमने हमे रुला दिया
हा व्यवधानांचा व्याप
तू जलधारी उःशाप
उजळावी चमकुन विजला
तू कधी स्मरावे मजला

भेटींचे निष्ठुर अंतर
दे मृद्गंधीसा दरवळ
मन होउन जावे सुजला
तू कधी स्मरावे मजला
वारी जन्मोजन्मी
पावले भाजती
तप्त वाळवंटी
नाथ नाही

वैशाखाचा ताप
सरेना सरता
कृपाछत्र आता
धरा देवा

समजून घ्यावा
भक्ती-कर्म योग
संसाराचा भोग
पांडुरंगा

तुझा काळा रंग
नभानेही प्यावा
आणि बरसावा
आशिर्वाद

बीज तरारावे
आणि अंकुरावे
चराचरी यावे
विठ्ठला तू

उभा विटेवरी
कटीवर हात
कोसळ सोडत
मेघदूता

पुण्यनगरीत
धाव आज तुझी
पालखी नभाची
उतरावी

- विभा
अचानक, आयत्या वेळेस
व्हॅनकाका बदलतील,
शाळेत सीसीटीव्ही नसतील,
स्वच्छतागृहे किती सुरक्षित खात्री नसेल,
हा कोण ओळखीचा...
तिचे केस ओढले...
थट्टेत की अजून काही?
खेटून बसलाय...
सहजच की आणिक काही?
खात्री होईपर्यंत
जरी वाट बघावी लागेल...
तरी तिला शाळेत जावंच लागेल...

कशासाठी स्वातंत्र्यलढा
कुणाचं योगदान?
कोण होते पूर्वज,
कोणाचं बलिदान?
कोण गेलं फाशीवर
आणि कोणाचं जळलं घर
एक ना एक दिवस तिला
शाळेबाहेरून कळेल...
तरी तिला शाळेत जावंच लागेल...

पुन्हा एकदा आंदोलन,
पुन्हा एकदा बंद
दगडफेक, जाळपोळ
सार्वजनिक व्यवस्था थंड
स्कुलबस बंद म्हणून
कामं बाजूला टाकून
सोडायला जावं लागेल,
आपल्याला दगड लागणारच नाही
अशी काही खात्री नसेल
तरी तिला शाळेत जावंच लागेल...

कट ऑफ्स, एन्ट्रन्स,
चौपट फी...
तरीसुद्धा कदाचित
लिस्टमध्ये नाव नसेल
स्वतःवर, शाळेवर, जगावर चिडेल
तरी तिला शाळेत जावंच लागेल...

त्यातूनच नवा मार्ग नवी दिशा मिळेल
त्यातूनच स्वतःहून काही ऋण मानेल