आत्ता आत्ताशी तर कुठे....
आत्ता आत्ताशी तर कुठे जरा शांत बसले होते... जरासे प्रश्न संपले होते, आता इतक्यातच येईल, आली की बूट, मोजे भिरकावून देईल, हेअरबँड एकीकडे, सॅक दुसरीकडे माझं लक्ष भलतीकडेच भिरकावलेल्या टिफिन बॅगकडे, डबा संपवला असेल ना... प्रश्न सुरु..... तिचे वेगळे! पण आली की तितक्याच वेगाने सुरु होतील शाळेतल्या गोष्टी, “हा पेपर, तो पेपर, ऑफ पिरिअड, ही कॉम्पिटीशन, टीचर बदल, नोटीस इ. इ. मग ह्यानं ना तसं तसं केलं, मी त्याच्यासाठी असं असं केलं तरी.... ती ना थांबलीच नाही माझ्यासाठी, मी थांबले होते तरी... मला अमुक अमुक नकोय आणि तमुक तमुक पण नकोय.... सरांनी ऐकूनच घेतलं नाही माझं, मला उत्तर माहित होतं तरी... मला ना स्पोर्ट्समध्ये पण जायचंय आणि डान्समध्ये पण! मी काहीच केलं नाही तरी टीचर ओरडल्या मला. अमुक अमुकचं असं झालं तर आता तमुक तमुकचं मी काय करू?” ..................... आता तिला काय उत्तर द्यावीत.... आत्ता आत्ताशी तर कुठे जरा शांत बसले होते... जरासे प्रश्न संपले होते... |
Tuesday, July 10, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment