Monday, March 12, 2018

आज किती वर्षांनी भेटतोय
हा धुवांधार पाऊस!
गरजणारा आणि बरसणारा पण !
मला आठवतं, तू भेटला नव्हतास तेंव्हा सुद्धा
मी अशीच उल्हासित व्हायची ह्या पावसानं.
आणि मग तुझी प्रतीक्षा
तुझ्याबरोबर पावसात चिंब व्हायची स्वप्नं.
पण तू भेटल्यावर देखील कित्येक पावसाळे
असे कोरडेच गेले.
मला वाटलं सगळा पाऊस आटून गेला.
पण आज परत भेटला
गरजत बरसत पूर्वीसारखा.
तू नाहीयेस बरोबर तरी .........
खरच!
प्रत्येकाचा पाऊस हा खूप आपापला असतो,
आणि चिंब चिंब होणं,
हे तर खूपच आपापलं असतं.

No comments:

Post a Comment