Monday, March 12, 2018

फळा होऊन जावा ओल्या कापडाने पुसल्यासारखा स्वच्छ,
किंवा सूर्य उगवताच काळ्याभोर पटलावरच्या तारका
धूसर होत होत मग व्हाव्यात दिसेनाशा..
किंवा
तप्त ग्रीष्माच्या दुपारी
अंधारून यावं आभाळ वळीवाच्या मेघांनी
आणि न कोसळताच पर्वतकड्यावरून निघून जावं,
वाऱ्याच्या वेगाने,
आणि काळ्याकभिन्न कातळाच्या टोकाला
उंची सांभाळताना बघताही येऊ नये
पाठ फिरून..
जेव्हा एक दिवस थांबून जातात
सखीच्या कविता, फोन्स, मेसेजेस..
- विभावरी
आज किती वर्षांनी भेटतोय
हा धुवांधार पाऊस!
गरजणारा आणि बरसणारा पण !
मला आठवतं, तू भेटला नव्हतास तेंव्हा सुद्धा
मी अशीच उल्हासित व्हायची ह्या पावसानं.
आणि मग तुझी प्रतीक्षा
तुझ्याबरोबर पावसात चिंब व्हायची स्वप्नं.
पण तू भेटल्यावर देखील कित्येक पावसाळे
असे कोरडेच गेले.
मला वाटलं सगळा पाऊस आटून गेला.
पण आज परत भेटला
गरजत बरसत पूर्वीसारखा.
तू नाहीयेस बरोबर तरी .........
खरच!
प्रत्येकाचा पाऊस हा खूप आपापला असतो,
आणि चिंब चिंब होणं,
हे तर खूपच आपापलं असतं.
फळा होऊन जावा ओल्या कापडाने पुसल्यासारखा स्वच्छ,
किंवा सूर्य उगवताच काळ्याभोर पटलावरच्या तारका
धूसर होत होत मग व्हाव्यात दिसेनाशा..
किंवा
तप्त ग्रीष्माच्या दुपारी
अंधारून यावं आभाळ वळीवाच्या मेघांनी
आणि न कोसळताच पर्वतकड्यावरून निघून जावं,
वाऱ्याच्या वेगाने,
आणि काळ्याकभिन्न कातळाच्या टोकाला
उंची सांभाळताना बघताही येऊ नये
पाठ फिरून..
जेव्हा एक दिवस थांबून जातात
सखीच्या कविता, फोन्स, मेसेजेस..
तू म्हणालास उराशी बाळगलेलं हे अलौकिक स्वप्न
विसर्जित करून टाक कालिंदीमध्ये
ह्या माझ्या मर्यादा, हे माझे कृष्णकिनारे
त्याला नाही पार करता येणार ते..
आणि सोयीस्कर नाही असे अट्टाहास
हृदयाशी जपून ठेवणं...
मात्र खूप पुढे येतो आपण,
आता परतीचे मार्ग बंद होतात कधी ...
किनाऱ्यांची निवड आपल्या हातात नसते ना
तेव्हा जीव असा तरंगू द्यायचा पाण्यावर ..
त्यातले हेलकावे हेच त्याचं प्रारब्ध
हेच त्यांचे किनारे ..
मला माहित आहे मित्रा !