तू नसण्याचं दुःख ...
कातळावर कोरलं रेतीवर रेखाटलं आभाळभर माखलं हातावर गोंदलं तू नसण्याचं दुःख .... भाजीबरोबर चिरलं पोळीमधे करपलं तेलातुपात माखलं लोणच्यामधे मुरवलं तू नसण्याचं दुःख ... डोळ्यांनी पुसलं कंठाने गिळलं ओठांनी लपवलं मनामधे रूजवलं तू नसण्याचं दुःख ... अक्षरातून गिरवलं शब्दातून सांडलं ओळींतून पाझरलं कवितांतून रिचवलं तू नसण्याचं दुःख ... |
No comments:
Post a Comment