एखाद्या अव्यक्त आणि
निस्तब्ध पहाटे
जाग आल्यानंतर
एकेक तारे मावळून
गेल्यानंतरही
खिडकीच्या गजातून झिरपणारं
सौम्य चांदणं
उशीवर अलगद उतरतं
तेंव्हा,
मी शोधत राहते
तुझ्या असण्या-नसण्याच्या
खाणाखुणा,
तेंव्हा कुठेतरी
दूरस्थ लकाकणारा
एक शाश्वत तारा
आश्वासित करतो ...........
‘मी इथेच आहे, इथेच
कुठेतरी आसपास’
कोसो मैलांवरून
नित्यनेमाने
चांदण्यांचे असे
काही कणभर क्षण हातात येतात,
आणि मग त्या निस्तब्धतेतही
एक
अनादी अनंत असा हुंकार
भरून राहतो.
No comments:
Post a Comment