असा कुठला दुवा,
कुठल्या लहरी
कुठले कोश असतील
जे न बोलता, न
लिहिता
तुझ्यापर्यंत काही
पोहोचवतील
माझ्याकडे काही घेऊन
येतील .....
असे कुठले दूत,
कुठला मेसेंजर
कुठल्या जाणीवा असतील
कोणत्याही
संगाव्याशिवाय
कोणत्याही
निरोपाशिवाय
मला तुझी आठवण तर
येतेच
पण तुला माझी आठवण
येतीये
हे मला कळेल.....
असा कुठला सहवास
असेल
जो न भेटता,
अस्पर्श चांदण्यासारखा
तनभर पसरेल
आणि मनभर खोल खोल
झिरपेल.....
No comments:
Post a Comment